Siddheshwar Swami: ज्ञानयोगी आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामी लिंगैक्य

Siddheshwar Swami: पद्मश्री हा नागरी पुरस्कार नाकारला होता

0

विजयपुर,दि.३: Siddheshwar Swami Passes Away: येथील ज्ञानयोग आश्रमाचे ज्ञानयोगी परमपूज्य श्री सिध्देश्वर स्वामीजी (Siddheshwar Swami) सोमवारी रात्री आठ वाजता लिंगैक्य झाले. ते ८२ वर्षांचे होते. चालता बोलता देव देवाघरी गेल्यामुळे त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजता सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. Siddheshwar Swami: spiritual master Siddheshwar Swami Lingaikya

तीनपर्यंत सिध्देश्वर स्वामीजींचे पार्थिव भक्तांच्या दर्शनासाठी | Siddheshwar Swami Passes Away

आज सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत त्यांचे पार्थिव भक्तांच्या दर्शनासाठी सैनिक स्कूल येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता सैनिक स्कूल येथून अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून सायंकाळी पाच वाजता विजयपूर आश्रमाच्या आवारात त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात येणार आहेत. यानिमित्त जिल्हा प्रशासनाने आज (मंगळवारी) सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. (Siddheshwar Swami News In Marathi)

Siddheshwar Swami
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिध्देश्वर स्वामी

सिध्देश्वर स्वामीजींचे राहणीमान अत्यंत साधे होते | Siddheshwar Swami

त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. तत्त्वचिंतक, विचारवंत, ज्ञानवंत आणि सात्त्विक विचारांच्या सिध्देश्वर स्वामीजींना केंद्र सरकारने पद्मश्री हा नागरी पुरस्कार जाहीर केला होता. मात्र स्वामीजींनी तो विनम्रपणे नाकारला होता. कर्नाटक विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी तसेच राज्य सरकारने दोनवेळा देऊ केलेले लाखो रुपयांचे अनुदानही त्यांनी आदरपूर्वक नाकारले होते. कर्नाटकातील चालता बोलता देव म्हणून ते ओळखले जात होते.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. डॉक्टरांच्या होणार पथकाकडून त्यांच्यावर विजयपूर आश्रमामध्ये उपचार चालू होते. त्यांची प्रकृती खालावल्याचे समजल्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भक्त त्यांच्या दर्शनासाठी विजयपूर आश्रमामध्ये गर्दी करत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना व्हील चेअरवर बसवून आश्रमाच्या बाहेर थांबलेल्या हजारो भक्तांना दर्शन घडविण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील भक्तांकडून मंदिरांमध्ये प्रार्थना करण्यात येत होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोबाइलद्वारे सिध्देश्वर स्वामीजी संवाद

कर्नाटकातील अनेक मठांचे मठाधीश सिध्देश्वर स्वामीजींच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी विजयपूर आश्रमाला भेट देऊन श्री सिध्देश्वर स्वामीजींच्या प्रकृतीची चौकशी केली होती. तसेच केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही आश्रमाला भेट दिली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोबाइलद्वारे सिध्देश्वर स्वामीजी यांच्याशी संवाद घडवून आणला होता. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे स्वामीजींच्या दर्शनासाठी सोमवारी आश्रमात आले होते.

शर्टाला खिसाही नव्हता…

२४ ऑक्टोबर १९४१ रोजी विजयपूर जिल्ह्यातील बिज्जरगी या गावी सिध्दगोंडा व संगव्वा यांच्यापोटी शेतकरी कुटुंबात सिध्देश्वर स्वामीजींचा जन्म झाला होता. कन्नड, संस्कृत, मराठी, इंग्लिश आदी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी कर्नाटक, महाराष्ट्रासह देश- विदेशात प्रवचने दिली. तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. अंगात पांढरा शर्ट, खांद्यावर उपरणे आणि पांढरा पंचा ही त्यांची वेशभूषा होती. सिध्देश्वर स्वामीजींच्या शर्टाला खिसाही नव्हता.

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव

आध्यात्मिक विचारांचा समाजमनावर मोठा प्रभाव होता. भूमी, जल, वृक्ष, फुले, पशु-पक्षी, सूर्य-चंद्र आदी निसर्ग निर्मित घटक हे त्यांच्या प्रवचनाचे विषय असत. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. तसेच सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी विचारांचे ते वाहक होते.

सिध्देश्वर स्वामीजींच्या अंतिम दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. अनेक पोलीस अधिकारी विजयपूरमध्ये दाखल झाले असून सुमारे एक हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here