सोलापूर,दि.७: श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विजय पंगुडवाले यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसाद वाटप केले. तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्यांची संख्या मोठी असते.
सुरुवातीला गवळी समाज पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल नायकु यांच्याहस्ते तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर अनिल नायकु यांच्याहस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी श्रीधर चिंता, श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय पंगुडवाले, सचिन जानकर, संजय जानकर, गणेश घुगरे, आकाश गायकवाड, अविनाश गायकवाड, सचिन हुच्चे, गोपी गंजी, दुर्गप्पा गबारे, रवी कुंभार यांनी परिश्रम घेतले.








