सोलापूर जिल्ह्यातील पानमंगरूळ येथे भर चौकात गोळीबार : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

सोलापूर,दि.८: सोलापूर जिल्ह्यातील पानमंगरूळ (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बंदुकीतून गोळीबार करुन व तलवारीने वार करुन प्रीतिज्ञान ऊर्फ गुलाब जिझींच्या पवार (वय ३६, रा. केगाव खु.) यास गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.६) दुपारी १ वाजता घडली.

याप्रकरणी संशयित आरोपी अनिल श्रीमंत पवार, मुन्न्या सुरेश काळे (दोघे रा. पानमंगरुळ), सनीदेवल सुरेश काळे, सनीदेवलचा भाऊ (दोघे रा. महातपुरी तांडा, ता. गंगाखेड) यांच्यावर दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

प्रीतिज्ञान हे बायको-मुलांसह राहण्यास असून ते मोलमजुरी करतात. आरोपी हे काही दिवसांपासून भागातील त्या शेतकऱ्यांकडे जबरदस्तीने सुगी मागत असल्याने फिर्यादीने त्यांना पाच दिवसांपूर्वी आमच्या भागामध्ये येऊन शेतकऱ्यांना सुगी मागू नका व येथून निघून जा असे म्हणून हाकलून दिले होते.

त्यावेळी सनीदेवल याने फिर्यादीस शिवीगाळी करुन तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यानंतर अनिल पवार याने वाद आपसात निपटून टाकू म्हणून पानमंगरुळ येथे बोलावून घेतले. त्यावेळी सनीदेवल याने बंदुकीने दहा ते पंधरा फूट अंतरावरुन फिर्यादीवर गोळी झाडली. ती गोळी फिर्यादीच्या पोटात घुसली. तेवढ्यात अनिल याने तलवारीने डाव्या पायावर वार केले. सनीदेवलच्या लहान भावाने देखील बंदुकीने पाठीमागून गोळी झाडली. ती गोळी फिर्यादीच्या पाठीस घासून गेली. फिर्यादीस लोक वाचविण्यासाठी येत असताना आरोपींनी तुम्हाला पण ठार करू, असे धमकाविले. फिर्यादीने तुरीच्या पिकातून धावत केगांव रोड गाठले. त्यावेळी त्याची बायको काजल पवार, देवीदास बंडू कोळेकर व इतर तीनजण आले. त्यांनी पोलिसांना फोन करून कळवले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here