महिलेसोबत 3 तरुणांचे धक्कादायक कृत्य, व्हिडीओ केला शेअर

0

नवी दिल्ली,दि.26: महिलेसोबत 3 तरुणांनी धक्कादायक कृत्य केले आहे. व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. महिलांची छेड काढणे, त्यांना त्रास देणं, अशा अनेक घटना देशभरात घडत असतात. दिवसेंदिवस यांचं प्रमाण वाढत चाललं असून तरुणाईदेखील अशी वाईट कृत्य करताना दिसून येत आहेत. विविध ठिकाणांहून आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. महिलांसोबत धक्कादायक कृत्य करताना तरुणांचा एक व्हिडीओ समोर आलाय. रात्रीच्यावेळी काही टवाळक्या तरुणांनी रस्त्याने चालणाऱ्या महिलेच्या कानशिलात दिली.

महिलेसोबत 3 तरुणांचे धक्कादायक कृत्य

काही टवाळक्या तरुणांनी महिलेला चापट मारल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. उत्तराखंडमधील खटीमा येथे घडली. संतापजनक गोष्ट म्हणजे तरुणांनी हे कृत्य करत असताना त्याचा व्हिडीओदेखील बनवला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्कूटरवर बसलेले तीन तरुण एका महिलेला मागून चापट मारतात. हा व्हिडिओ रात्री उशिराचा आहे. रात्री उशिरा रस्त्याने जाताना दोन महिला दिसल्यावर त्या तिघांनीही त्यांना स्कूटरवर जाऊन चापट मारण्याचं ठरवलं. एक तरुण कॅमेरा ऑन करतो आणि व्हिडिओ शूट करू लागतो. यानंतर त्यांनी स्कूटर महिलांकडे वळवली आणि नंतर चालत्या स्कूटरवरुन एका महिलेला चापट मारली. याशिवाय ते संतापजनक कृत्य करुन हसत होते.

preeti Yadav नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 39 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून यावर अनेक संताप व्यक्त केला जात आहे. वापरकर्त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘महिलांचं रस्त्यावर चालणंही कठिण झालंय. तरुणांची हिम्मत तर बघा हा व्हिडीओ बनवून स्वतः व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. कधी कधी वाटतं रात्री तरुणांचं बाहेर निघणंच बंद करायला हवं.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here