सोलापुरातील माजी आमदाराने केला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश 

0

सोलापूर,दि.13: ऐन विधानसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रवेश केला आहे. शिवशरण बिराजदार पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेतून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. यामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ व शहरात भाजपाला निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. शिवशरण अण्णा पाटील कार्यकर्त्यांच्या अडचणीत मदतीला धावून जाणारे नेते आहेत. एका फोनवर उपलब्ध होणारा सामान्यांचा नेता अशी त्यांची ओळख आहे.

शिवशरण बिराजदार पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामुळे दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. सोलापूरचे दोन्ही आमदार कामाचे नसून त्यांनी शहर भकास केले. दोन्ही देशमुखांच्या भांडणामध्ये शहर भकास झाले. असे शिवशरण अण्णा पाटील म्हणाले.

शिवसेनेमध्ये प्रवेश करताच शिवरशरण पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपमध्ये गेलो, ती माझी वाट चुकली होती. मी माझ्या घरी परत आलो, याचा आनंद होत आहे. शिवसेना प्रमुखांनी मला ताईत घातले होते आणि आज उद्धव साहेबांनी माझ्या हातात शिवबंधन बांधले, असले ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here