शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षास मिळालेल्या नवीन चिन्हाचे सोलापुरात पूजन

0

सोलापूर,दि.11: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षास मिळालेल्या मशाल चिन्हाचे सोलापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवा ढोकळे आणि सहकारी शिवसैनिकांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथून प्रज्वलित करुन आणलेल्या मशालीचे पूजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर श्री गणरायाची आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन झाले.

यावेळी ढोल – ताशांच्या गजरात भगवे फेटे बांधून भगवे शेले परिधान केलेल्या शिवसैनिकांनी जल्लोष केला. तसेच यावेळी शिवसैनिकांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी जय भवानी जय शिवराय, मशाल पेटली महाराष्ट्रात घुसली, आली रे आली मशाल आली, या गद्दारांचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतील गद्दारांना हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे चिन्हही काढून घेण्यात आले. त्यामुळे गद्दारांच्या गटाला आसुरी आनंद झाला आहे. परंतु शिवसेनेला चिन्हामुळे फारसा फरक पडत नाही. आम्हाला मशालचिन्ह मिळाल्यामुळे राज्यातील तमाम शिवसैनिक आनंदी झाला आहे. हे चिन्ह आता आम्ही घराघरात पोहोचवणार आहोत. 2024 साली होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर आम्ही भगवा फडकवू, असेही जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यावेळी म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, शहर संघटक अतुल भवर, महिला आघाडीच्या शहरप्रमुख भक्ती जाधव, शहर उत्तर विधानसभेचे समन्वयक महेश धाराशिवकर, प्रा. अजय दासरी, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, उपशहरप्रमुख संजय साळुंखे, उपशहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख रेवण पुराणिक, उपशहर प्रमुख सुरेश जगताप, उपशहर प्रमुख रेवण बुक्कानुरे, उपशहर प्रमुख अनिल कोंडुर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे शहर संघटक रविकांत गायकवाड, युवा सेना जिल्हा सचिव ॲड. मुनिनाथ कारमपुरी, प्रशांत जक्का, निरंजन बोद्दुल, अनिल कोंडूर, ॲड. मंगेश श्रीखंडे, सचिन गंधुरे, विभाग प्रमुख शिवा ढोकळे, तुषार आवताडे, अनिल दंडगुळे, दिनेशसिंग चव्हाण, विजय पुकाळे, विठ्ठल कुराडकर, सुरेश तेली, रेखा आडकी, राधा आवार, योगेश क्षीरसागर, रोहित सुरवसे, विष्णू जवंजाळ, आबा सावंत, महेश गवळी, गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते. केदारी राचर्ला यांनी पौरोहित्य केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here