मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील या खासदारांची उपस्थिती

0

मुंबई,दि.11: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी बोलावलेल्या बैठकीला लोकसभेचे एकूण 12 खासदार (Shivsena MP) उपस्थित आहेत. शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरांचे वारे वाहत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले त्यांच्या बरोबर 40 आमदार गेले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण, आता शिवसेनेत खासदार सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी बोलावलेल्या बैठकीला एकूण 7 खासदार (Shivsena MP) गैरहजर आहे.

शिवसेना सध्या मोठ्या बंडाळीने ग्रस्त झाली आहे. एकापाठोपाठ आमदार, नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये खासदारांचे दबाव तंत्र सुरू आहे. शिवसेनेच्या खासदारांनी उघडपणे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक होत आहे.

लोकसभेतील 19 पैकी अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, प्रतापराव देशमुख, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर आदी 12 खासदार उपस्थित आहेत.

या बैठकीला एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. तर ईडीच्या कारवाईने त्रस्त असलेल्या खासदार भावना गवळी सुद्धा या बैठकीला गैरहजर आहे.

दरम्यान, या बैठकीत शिवसेना पक्ष येत्या 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि आमदार NDA चे उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात आज ‘मातोश्री’वरील बैठक संपल्यावर शिवसेनेकडून अधिकृत भूमिका जाहीर होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here