छत्रपती संभाजीनगर,दि.8: शिवसेना ठाकरे गटाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते, माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रा.पं. सदस्य व शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सूर्या लॉनमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा आज रविवारी सूर्या लॉनवर पार पडला. यावेळी माजी उपमहापौर राजू शिंदे, जि.प. सदस्य सय्यद कलीम, माजी नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, संभाजी चौधरी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत प्रधान, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश पवार, युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ शिंदे, मंडळ अध्यक्ष पैलास वाणी, शंकर म्हात्रे, प्रवीण कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदे यांनी हातात शिवबंधन बांधले. यावेळी राजू शिंदेंसोबत 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे यांनी भाजपच्या विविध पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. गेल्या दोन दिवसांपासून भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात होता.
या पदाधिकाऱ्यांनी केला ठाकरे गटात प्रवेश- राजू शिंदे (माजी उपमहापौर भाजप) – गोकुळ मलके (नगरसेवक भाजप) – प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप) – अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी) – प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष) – रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) – सय्यद कलीम (जिल्हा परिषद सदस्य शिंदे गट) – सतीश पाटील (पंचायत समिती सदस्य भाजप) – संभाजी चौधरी (ग्रामपंचायत सदस्य भाजप) – वसंत प्रधान (भाजप जिल्हा उपाध्यक्ष) – माया पाटील ( ग्रामपंचायत सदस्य) – शंकर म्हात्रे – कैलास वाणी – प्रवीण कुलकर्णी – अभिजित पवार- मयूर चोरडिया – सौरभ शिंदे – आकाश पवार.