Sheetal Teli Ugale: आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली टाकळी पंप हाऊस आणि औज बंधाऱ्याची पाहणी

0

सोलापूर,दि.29: सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले (Sheetal Teli Ugale) यांनी आज महापालिकेच्या टाकळी पंप हाऊस तसेच औज बंधारा येथे पाहणी केली. सोलापूर शहरासाठी उजनी जलाशयातून भीमा नदीच्या पात्रातून वर्षाला एकूण 5 रोटेशनने पाणी सोडले जाते.

Sheetal Teli Ugale: आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली पाहणी

तसेच उजनी जलाशयातून भीमा नदी पात्रातून सोलापूर शहरासाठी औज बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले असून औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तसेच औज बंधाऱ्यातील पाणी पुढे औज व चिंचपूर बंधाऱ्यात येते आणि पुढे शहराला टाकळी इंटेकवेल येथून उपसा करून पुढे शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. यावेळी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आदी ठिकाणाची पाहाणी करून अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Sheetal Teli Ugale
आयुक्त शीतल तेली-उगले

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक अभियंता नीलकंठ मठपती, सहायक अभियंता यलगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here