विधानसभा निकालाबाबत शरद पवारांचे मोठं भाकीत, काँग्रेस आमदार म्हणाले…

0

मुंबई,दि.11: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी विधान सभेच्या निकालाबाबत मोठं भाकीत केलं आहे. त्यांच्या या दाव्यावर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काय म्हणाले शरद पवार?

सुधाकरराव भालेराव आणि इतर नेते आले. देवळालीतील कार्यकर्ते आले आहेत. हे घर तुमच्या सर्वांचे आहे. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. त्यामध्ये, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 लोकांना निवडून दिले, ही सुरुवात आहे. आता,  विधानसभेच्या 288 जागा आहेत, त्यात 225 पेक्षा जास्त जागा आपल्या निवडून येतील, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला. 

काँग्रेस आमदार काय म्हणाले?

“शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचं भाकीत कधीच खोटं ठरत नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत 31 जागा जिंकणार, असा दावा केला होता. विशेष म्हणजे आम्ही तेवढ्या जागा जिंकलोदेखील, त्यामुळे शरद पवार यांच्या दाव्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 225 जागा जिंकेल”, अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here