Sharad Pawar | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरण शरद पवार स्पष्ट म्हणाले

Sharad Pawar News | शरद पवारांनी नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे

0

मुंबई,दि.12: Sharad Pawar | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar News) वादग्रस्त वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार (Sharad Pawar News) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरही टीका केली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई यशवंत चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा Jitendra Awhad | राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा दिवंगत आनंद दिघे यांच्याबाबत मोठा दावा

नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांची टीका | Sharad Pawar News

‘राज्यकर्त्यांनी सुद्धा संपुर्ण देशाच्या प्रांताकडे बघताना देशाचे नेतृत्व करतो असा दृष्टीकोन पाहिजेत. देशाचा पंतप्रधान सरकारी कार्यक्रमात विरोधकांवर टीका करतो हे कितपत शहाणपणाचं आहे याचा विचार केला पाहिजे’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

शाईफेक प्रकरणावर शरद पवार म्हणाले | Sharad Pawar News

चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. दरम्यान, एका तरुणाने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या प्रकरणी  प्रतिक्रिया देताना शाई फेक करणे योग्य नसल्याचे म्हटले आहेत. तसेच चंद्रकांत पाटील यांनाही चार शब्द सुनावले आहेत.

Sharad Pawar News

जे काही प्रकार झाले त्याचं समर्थन मी करणार नाही

वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की,  काही प्रकार झाले. शिक्षण मंत्र्यांवर शाई फेकली. जे काही प्रकार झाले त्याचं समर्थन मी करणार नाही. हे योग्य नाही. विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार त्यांच्या जसा आहे. तसेच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आपलाही आहे. मात्र टीका करणे याचा अर्थ कुणाच्या अंगावर शाई फेकणे असा होत नाही. त्याचं समर्थन आपण कधी करणार नाही. मात्र चंद्रकांत पाटील यांनी नेमकं केलं काय याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी जे विधान केलं ते केलं नसतं तर कदाचित हा प्रकार घडला नसता, असे शरद पवार म्हणाले.

फुलेंचं आणि आंबेडकरांचं संपूर्ण जीवन संपूर्ण देशाला माहिती आहे

शरद पवार पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी फुलेंचा उल्लेख केला. आंबेडकरांचा उल्लेख केला. भाऊराव पाटील यांचा उल्लेख केला आणि मग शब्द वापरला भीक. हा शब्द कुणालाही आवडणार नाही. फुलेंचं आणि आंबेडकरांचं संपूर्ण जीवन संपूर्ण देशाला माहिती आहे. कर्मवीरांना आपलं जीवन ज्ञानदानासाठी घालवलं. पैसे नसतानासुद्धा आपल्या पत्नीच्या गळ्यातील दागिने विकले, पण शिकणाऱ्या मुलांचं दोन वेळचं जीवन थांबू दिलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेचं ब्रिद आहे कमवा आणि शिका, भिक मागा असं नाही. या संस्थेचा मी गेल्या ५० वर्षांपासून अध्यक्ष आहे. तिथे आम्ही कधी राजकारण आणत नाही. अशा संस्थापकांबाबत कर्मवीर भाऊरावांबाबत, फुलेंबाबत, आंबेडकरांबाबत बोलत असताना भीक मागणं असा शब्द वापरला नसतं तर बरं झालं असतं, असे शरद पवार म्हणाले.

नंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की मी सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा आहे म्हणून आपल्याविरोधात हे केलं. मात्र तुम्ही आधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होता. प्रदेशाध्यक्ष होता. आताही मंत्री आहात. सामान्य कुटुंबातील एखादी व्यक्ती सत्तेपर्यंत पोहोचली याचं उदाहरण केवळ तुम्हीच आहात का? अनेकजण पोहोचले. त्यांच्यावर टीकाटिप्पणीही झाली. मात्र त्यांनी असा कांगावा केला नाही. असो. मी यावर अधिक बोलत नाही. याचं समर्थन करत नाही. मी महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्वपक्षीय मित्रांना आवाहन करतो की, शाई टाकणं, तत्सम कृत्य करणं, असले प्रकार आपण करणार नाही, अशी भूमिका आपण घेऊन. तसेच सुसंस्कृत महाराष्ट्राचा लौकिक टिकवण्याची खबरदारी घेऊ, असं आवाहन करतो, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.    


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here