Sharad Pawar On Jayant Patil: जयंत पाटील भाजपात जाणार का? शरद पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.१४: Sharad Pawar On Jayant Patil: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं राज्यातील राजकारणात पुन्हा काही हालचाली सुरू झाल्या का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. यावेळी जयंत पाटीलही हजर होते. या भेटीबाबत कुणालाही काही कळवण्यात आले नाही. या भेटीवर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं, ही भेट काका-पुतण्याची होती, कौटुंबिक होती, असे ते म्हणाले. त्यांच्या या भेटीनंतर अद्यापही चर्चा सुरूच आहेत. त्यातच, जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आल्याने पुन्हा जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चा घडत आहेत. 

शरद पवार म्हणाले… | Sharad Pawar On Jayant Patil 

जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चासंदर्भात शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ईडीची भीती घालून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपच शरद पवार यांनी केला. 

पुण्यातील आमच्या बैठकीत अजिबात राजकीय चर्चा नव्हती. जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस आल्याचे मला समजले. सत्तेचा गैरवापर करुन काही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनाही अशा नोटीसा आल्या. त्यामुळे, ते भाजपासोबत जाऊन बसले. आज तोच प्रयत्न जयंतराव यांच्यासोबत करण्याची भूमिका घेतलेली दिसते. पण, मला खात्री आहे की, त्यांची भूमिका स्पष्ट आहे, असे म्हणत जयंत पाटील हे आपल्यासोबतच असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here