Sharad Pawar: निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार यांचे मोठं वक्तव्य

Sharad Pawar: निकाल लागल्यावर त्यावर काही चर्चा करता येत नाही

0

मुंबई,दि.१८: Sharad Pawar On Election Commission’s Decision: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे.

शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली प्रतिक्रिया | Sharad Pawar On Election Commission’s Decision

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नवीन चिन्ह घेतील ते लोक मान्य करतील

“निकाल लागल्यावर त्यावर काही चर्चा करता येत नाही. त्याला स्वीकारायचं आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणाम होत नसतो,” असं शरद पवार म्हणाले. एकदा काँग्रेसमध्ये एकदा हा वाद झाला, त्यावेळचं चिन्ह गेलं त्यानंतर काँग्रसने हात घेतला. ते लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह घेतील ते लोक मान्य करतील. १०-१५ दिवस चर्चा होईल, त्याचा फारसा परिणाम होत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “काय सुरुवात करायची आणि काय बोलायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मी तर असे म्हणेन की दुर्दैदाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षांचे स्वातंत्र्य संपले आहे. आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here