Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपचे 13 आमदार राजीनामा देणार असल्याचा केला दावा

0

मुंबई,दि.11: उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या (UP Assembly Elections) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उत्तर प्रदेशात (Uattar Pradesh) भाजपा (BJP) पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा करत आहे तर समाजवादी पार्टीने आपलाच पक्ष सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पार्टीचे 13 आमदार पक्षाचा राजीनामा देणार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समजावादी पक्ष आणि इतर लहान पक्षांसोबत मिळून उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशातील चित्र बदलत असून तिथे परिवर्तन होणार आहे. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे 13 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. पुढील काही दिवसांमध्ये भाजपमधील नेते दररोज पक्ष सोडतील. यामध्ये भाजपच्या 13 आमदार आणि काही ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचे पवार यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समजावादी पक्ष आणि इतर लहान पक्षांसोबत मिळून उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशातील चित्र बदलत असून तिथे परिवर्तन होणार आहे. लोकांना बदल हवा आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपचा राजीनामा दिला ही तर सुरुवात आहे. पुढील काही दिवसांत भाजपचे आणखी नेते परिवर्तनाच्या प्रक्रियेत सामील होतील. दररोज एक नवा चेहरा पक्ष सोडेल, असे शरद पवार यांनी म्हटले.

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक दिग्गज नेता अशी ओळख असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज बॉम्ब फोडला. मौर्य यांनी मंत्रिपद आणि पक्षाचा त्याग करत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपला आणखीही धक्के बसले असून तीन आमदारांनीही आज भाजपला रामराम ठोकला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here