Shankar Mhetre: शंकर म्हेत्रे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

Shankar Mhetre: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल आहे गुन्हा

0

सोलापूर,दि.18: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अक्ककोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर सातलिंगआप्पा म्हेत्रे (Shankar Mhetre) आणि गुरुशांत कोलाटी दोघे रा. दुधनी, ता. अक्कलकोट यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (दि.18) अतिरिक्त सत्र न्यायाधीश भोसले यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

हेही वाचा Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजपा नेत्यांना मुस्लीम समाजाबाबत सल्ला

काय आहे प्रकरण? | Shankar Mhetre

यात हकीकत अशी की सन 2015 चे नोव्हेंबर महिन्यात शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे रा. दुधनी ता. अक्कलकोट यांनी त्यांचे शांभवी इंडस्ट्रीज अंतर्गत ऐश्वर्या अक्वा व अक्यूफीअर ड्रॉप वॉटर क्युरीफाय कंपनी चालू केली. सदर कंपनी मधे फिर्यादी नोव्हेंबर 2015 पासून मार्केटिंग मॅनेजर म्हणून कामास लागला सदर कंपनीत मॅनेजर म्हणून रेवनसिद्ध मल्लिनाथ सोन्नद रा. दुधनी तालुका अक्कलकोट हे मागील चार वर्षांपूर्वीपासून कामास होते. त्या दोंघाशिवाय सदर कंपनी मधे असिस्टंट मॅनेजर म्हणून सद्दाम मक्तुम नदाफ रा. दुधनी तालुका अक्कलकोट, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून संतोष संगण्णा जेवर्गी रा. सोलापूर सध्या रा. दुधनी तालुका अक्कलकोट असे काम करत होते.

Shankar Mhetre
शंकर म्हेत्रे

हिशोब देत नव्हता सोन्नद

31 जुलै 2022 अखेर शंकर म्हेत्रे यांना हिशोब द्यावयाचे असल्याने मे 2022 मधे फिर्यादी ने कंपनीचा मॅनेजर मयत रेवणसिद्ध सोन्नद यांना दोन ते तीन वेळा उधारीची यादी मागितली परंतु सोन्नद यादी देत नव्हता. त्यावेळी फिर्यादी व सद्दाम नदाफ असे दोघांनी मिळून प्रथमेश म्हेत्रे यांना उधारी देत नसल्याचे संगितले. त्यावेळी शंकर म्हेत्रे यांनी रेवणसिद्ध सोन्नद यास हिशोब मागितला.

सोन्नद याने व्हॉटसॲप मेसेज केला…

त्यावेळी त्याने टाळाटल केली. त्यानंतर सोन्नद याने व्हॉट्सॲपद्वारें माझी मनस्थिती चांगली नाही म्हणून हिशोब पूर्ण देवू शकत नाही, असा मेसेज पाठविला. तदनंतर शंकर म्हेत्रे, गुरुषात कोलाती व इतर यांनी हिशोब करुन फिर्यादी व सोंनद यांचेकडे चाळीस लाख रुपये निघतात, असे सांगून ते देण्याकरिता दमदाटी करून कपनीचे लेटर पॅडवर जबरदस्तीने लिहून घेतले व त्यावेळी आठ दिवसात पैसे द्या नाही तर तुम्हाला खलास करतो व तुमच्या विरुध्द पोलिसात तक्रार दाखल करतो अशी धमकी देऊन जबरदस्तीने सह्या घेतल्या.

त्यानंतर रेवण सिद्ध सोणाद याने कंपनी मधे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली त्यास शंकर म्हेत्रे व गुरुशांत कोलाटी यांनी प्रवृत्त केले अशा आशयाची फिर्याद काशिनाथ येरगल यांनी अक्ककोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.

शंकर म्हेत्रे यांचा अटकपूर्व जामीनसाठी अर्ज | Shankar Mhetre News

सदर गुन्ह्यामध्ये शंकर म्हेत्रे व गुरुशांत कोलाठी यांना अटक होईल ह्या भीतीपोटी त्यांनी मे. कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार असून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू व अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यात आरोपी असल्याने संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचे या सूनवणीकडे लक्ष लागलेले आहे.

यात मूळ फिर्यादीतर्फे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. राहुल रूपनर सरकारतर्फे रामपुरे तर आरोपीतर्फे ॲड. श्रीकांत गडदे हे काम पाहत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here