चंद्रकांत पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा

0

सोलापूर,दि.18: चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना होणार होती असा दावा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. 

2019 मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत राज्यात सत्ता स्थापन केली होती. चंद्रकात पाटील म्हणाले 2019 मध्ये सरकार गेले, मी त्यावेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यानंतर 33 महिने आम्ही काय सहन केले हे आम्हाला माहिती आहेत.

चंद्रकात पाटील माढा येथील रणजीत नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, फडणवीसांना अटक होणार होती, तेव्हा हे दिवस जातील असं आम्हाला वाटत होते, ते गेलेही, कुणाच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असं त्यांनी म्हटलं. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकात पाटील यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कटकारस्थान होत होते, त्या लोकांनी प्रयत्न खूप केले. पण सापडत काही नव्हतं. खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी केल्या. त्याबाबत सविस्तर पुन्हा कधी बोलू अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here