Selfie Taken With A Skeleton | कबरीतून सात वर्षांपूर्वीचा सांगाडा काढला बाहेर, सेल्फी काढला…

0
Selfie Taken With A Skeleton

सोलापूर,दि.२१: आजकालच्या काळात काय घडेल किंवा तरुण पिढी काय करेल हे सांगता येत नाही. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाला सात वर्षांच्या महिलेच्या सांगाड्यासोबत सेल्फी काढताना (Selfie Taken With A Skeleton) रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी कांथी परिसरात एका स्थानिक महिलेला पुरण्यात आले होते. त्याच महिलेचा सांगाडा एका तरुणाने कबरीतून बाहेर काढला. यानंतर तो सांगाड्यासोबत उभा राहिला आणि सेल्फी घेऊ लागला. (Selfie Taken With A Skeleton Marathi News) 

एका तरुणाने महिलेच्या सांगाड्यासोबत काढला सेल्फी | Selfie Taken With A Skeleton

जेव्हा गावकऱ्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. प्रभाकर सीता असे या तरुणाचे नाव आहे. संतप्त जमावाने त्या तरुणाला पकडून मारहाण केली. माहिती मिळताच कंठी पोलिस ठाणे घटनास्थळी पोहोचले.

जेव्हा पोलिस त्या तरुणाला वाचवण्यासाठी आले तेव्हा गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली आणि पोलिसांवर विटा फेकण्यात आल्याचा आरोप आहे. या चकमकीत तीन पोलिस जखमी झाले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी गर्दी नियंत्रित केली आणि गंभीर जखमी तरुणाला कंठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण दारूच्या नशेत होता. त्याच्या जवळ एक दारूची बाटलीही सापडली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, हा तरुण पूर्वी दुसऱ्या राज्यातील हॉटेलमध्ये काम करत होता, परंतु दारूच्या व्यसनामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्याने महिलेचा सांगाडा का काढला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here