सोलापूर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 144 कलम लागू

0

सोलापूर दि.13 : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कमी होणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शासनाने कन्टेन्मेंट झोन बाहेरील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे दि. 7 ऑक्टोबर 2021 पासून खुले करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. (Section 144 to prevent corona outbreak in Solapur district)

फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद्द वगळून ) 65 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. आणि कोविड – 19 लसीचा दुसरा डोस झाल्यानंतर 14 दिवस उलटून गेलेले आहेत. त्यांना सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळांना भेट देण्यास व धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतूदीनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरूध्द संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्य्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here