लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण भागात कलम 144 लागू

0

सोलापूर,दि.19: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी घोषित झाला आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच शस्त्र परवानाधारकाकडून त्यांच्याकडील शस्त्राचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) 16 मार्च ते 6 जून या कालावधीत परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कालावधीत  विशेषत: मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीच्या काळात परवान्यांवरील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन दि. 16 मार्च 2024 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि.6 जून 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापूर जिल्हयात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्व शत्र परवाना धारकांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र जवळ बाळगुन फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here