satta market up election: सट्टा बाजारच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळणार?

0

नवी दिल्ली,दि.११: satta market up election 2022: पाच राज्यात विधानसभेच्या (Assembly Election 2022) निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणूकपूर्व अनेक ऑपिनियन पोल घेण्यात आले. सट्टा बाजाराची पसंदी समोर आली आहे. विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधींचा सट्टा (satta market) लावला जात आहे. उत्तर प्रदेशात गुरुवारी पहिल्या टप्प्याचं मतदानही झालं. आता इतर टप्प्यांसाठी प्रचार तोफांनी (satta market on up election 2022 ) धुरळा उडवला आहे. एकीकडे निवडणुकांचा मौसम रंगात आला असताना दुसरीकडे निवडणुकांववरून सट्टाबाजारही गरम झाला आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. १० फेब्रुवारीपासून मतदानाला सुरू झाले आहे. यूपीत सात टप्प्यांत झालेल्या मतदानानंतर १० मार्चला निकाल लागणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होणार आहे.

हेही वाचा Marathi Movie: २९ एप्रिलपासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार, अजय अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार



यंदाच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवर आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. सध्या यूपीतील सट्टा मार्केटमध्ये बुकी कोणावर पैसे गुंतवत आहेत? हे बघून तुम्हालाही धक्काच बसेल. भाजपवर २३३-२३५ चा भाव सुरू आहे. म्हणजे, बुकींच्या मते, जर यूपीमध्ये भाजपच्या २३३ पेक्षा कमी जागांवर कोणी नाही केले, तर त्याला दुप्पट पैसे मिळतील. आणि जर २३५ हून अधिक जागा मिळतील, यावर ‘होय’ केले तर त्याला दुप्पट पैसे मिळतील.

तसेच समाजवादी पक्ष (सपा) – १२४ ते १२६ , बहुजन समाज पक्ष (बसपा) ९ ते १०, १-२ असा भाव काँग्रेसवर चालू आहे. म्हणजे ‘सपा’ला १२४ ते १२६ जागा, ‘बसपा’ला ९ ते १० जागा आणि काँग्रेस १ ते २ जागा जिंकेल, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यूपीमधील निवडणुकीनंतर सट्टेबाजीतील सर्वात मोठा पैसा पंजाबवर लावण्यात आला आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक संधी आम आदमी पार्टीला आहे, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे.

पंजाबमध्ये सट्टेबाजांनी आम आदमी पार्टीवर (आप ) विश्वास व्यक्त केला आहे. ‘आप’ला पंजाबमध्ये ५८ ते ६० जागा, काँग्रेसला ३० ते ३२ जागा आणि अकाली दलाला १८ ते २० मिळतील असा अंदाज आहे. यावर सट्टा लावला जात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ट्रेंडनुसार किंमती बदलू शकतात, असे सट्टेबाजांच्या मत आहे. त्याचवेळी उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याबाबत सट्ट्याचे वातावरण थंडावले आहे. निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याने तेथील सट्टेबाजीचे दरही खुले होतील. पण गोव्यात भाजप मोठा पक्ष ठरेल, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here