Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांचे शिंदे गटाबद्दल मोठं विधान

Sanjay Raut: काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली असं होतं नाही असे संजय राऊत म्हणाले

0

नाशिक,दि.2: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे गटाबद्दल मोठं विधान केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

संजय राऊत काय म्हणाले?

“काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली असं होतं नाही. 40 नेते गेले असले तरी, पक्ष जमीनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत. शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही”, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण म्हटलेलं मला आवडलेलं नाही

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 100 तोंडी रावण म्हटलं गेलं हे मलाही आवडलेलं नाही. पण त्यावर पंतप्रधानांनी जनतेसमोर अश्रू ढाळत हा गुजरातचा अपमान असल्याचं आवाहन जाहीर सभेत केलं. मग महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाजारांचा झालेला अपमान हा राज्याचा अपमान नाही का? असा सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

‘गद्दार’ हे त्यांच्या कपाळावर कोरलं गेलंय

“ज्या पद्धतीनं दिवार सिनेमात अमिताभ बच्चनच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ कोरलं गेलं होतं. त्याचपद्धतीनं या गद्दारांच्या माथ्यावर गद्दारी कोरली गेली आहे. त्यांची बायका, पोरं आणि नातेवाईक यांच्या पिढ्यानपिढ्यांना गद्दारी लक्षात राहील. जनता कधीच काही विसरत नाही. तुम्ही आताही निवडणूक घ्या शिवसेनाच निवडून येईल”, असंही राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here