Sanjay Raut: संजय राऊत यांनी ‘तो’ फोटो शेअर करत सीबीआय चौकशीची केली मागणी 

0

मुंबई,दि.२१: Sanjay Raut Shared Photo: हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेता प्रफुल लोढा (Praful Lodha) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल लोढा यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. हनी ट्रॅपसह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. आता याच लोढाचा गिरीश महाजन यांच्यासोबतचा फोटो शिवसेना (ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला असून फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वासू कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्यावर हनी ट्रॅपचा आरोप करून एकनाथ खडसे यांनी खळबळ उडवली. मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर आता संजय राऊत यांनीही गिरीश महाजन यांचा एक फोटो ट्विट केला आहे.

फोटोत काय आहे? | Sanjay Raut Shared Photo

संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक्स (आधीचे ट्विटर) वर गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा याचा एक फोटो शेअर केला आहे. यात लोढा गिरीश महाजन यांचा पेढा भरवताना दिसत आहे. या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करा अशी मागणी राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात,

महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले:

या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या!

दुध का दूध पानी का पानी होईल!

४ मंत्री अनेक अधिकारी अडकले आहेत!

शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा ) याच ट्रॅपमुळे पळाले, असे राऊत यांनी म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here