मुंबई,दि.२४: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरन्यायाधीश सुर्यकांत यांचा फोटो शेअर केला आहे. म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख! अशी कॅप्शन राऊत यांनी देत फोटो शेअर केला आहे. सोशल मिडीयावर (X वर) उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरन्यायाधीश सुर्यकांत यांचे मुंबईत स्वागत करतानाचा फोटो शेअर केला होता. राऊत यांनी शिंदे यांची पोस्ट रिपोस्ट केली आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या तीन वर्षापासून सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
सरन्यायाधीश हे एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. यावेळी मुंबई विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आणि याचे फोटो समाज माध्यमावर टाकले. शिंदे यांची पोस्ट रिशेअर करत “म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख”, असे एका ओळीचे कॅप्शन देत संजय राऊत यांनी टीका केली.








