Sanjay Raut | “युद्ध सुरू झाले आहे, पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यात आले आहेत घाबरून…” संजय राऊत 

0
Sanjay Raut | Narendra Modi

पुणे,दि.४: युद्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यात आले आहेत. घाबरून पाकिस्तानी नेते आणि दहशतवादी पाकिस्तान सोडून पळाले आहेत, पण हे सर्व मीडियात सुरू आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राऊत बोलत होते. (Sanjay Raut Reaction On Pahalgam Terrorist Attack)

काय म्हणाले संजय राऊत? | Sanjay Raut On PM Modi

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांच्या चेहर्‍यावर कोणतेही दुख आणि चिंता दिसत नसल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. दरम्यान, पाकिस्तानला पंतप्रधान मोदी धडा शिकवणार आहेत. पण कधी शिकवणार हेच समजत नाही. आम्हीच चिंतेत आहोत, ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील याची काळजी आम्हालाच आहे, असा चिमटाही राऊत यांनी काढला. (Sanjay Raut On PM Modi)

Sanjay Raut Reaction On Pahalgam Terrorist Attack
संजय राऊत | नरेंद्र मोदी

राऊत म्हणाले, पहलगाम  हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान तात्काळ बिहारला गेले. तिथल्या प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर पंतप्रधान देशभरात टंगळमंगळ फिरत आहेत. मुंबईत नऊ तास नट-नट्यांसोबत हास्यविनोद करत आहेत. आंध्रप्रदेशचे नेते पवन कल्याणसोबत हास्यविनोद करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एकही लकेर दिसली नाही. पंतप्रधान खुष मिजास आहेत. पुलवामा हत्याकांडानंतर भाजपच्या नेत्यांच्या चेहर्‍यावर दुख दिसले नाही. मोदींच्या चेहर्‍यांवर चिंता दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.

पाकिस्तानला पंतप्रधान मोदी धडा शिकवणार आहेत. पण कधी शिकवणार हेच समजत नाही. आम्हीच चिंतेत आहोत, ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील याची काळजी आम्हालाच आहे, असा चिमटा त्यांनी काढला. त्यांनी यावेळी पंतप्रधानांच्या धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नसल्याचे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here