Sanjay Raut | ‘शुभ प्रभात, माझे एकेकाळचे मित्र व…’ संजय राऊत 

Sanjay Raut | संजय राऊत यांनी आपल्या X हँडलवरून एक पोस्ट केली आहे

0

सोलापूर,दि.३०: Sanjay Raut Presents Book To Eknath Shinde | शिवसेना नेते (उध्दव ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी X वर केलेली पोस्ट चर्चेत आहे. राऊत यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट केली असून यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जय महाराष्ट्र म्हणत नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक चांगलेच चर्चेत आहे. खासदार राऊत हे १०० दिवस तुरुंगात होते. 

ईडीने कारवाई करत राऊत यांना १०० दिवस तुरुंगात टाकलेले असताना आलेल्या अनुभवांवर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्याच सोबत खुद्द संजय राऊत यांनी राज्यातील विविध नेत्यांना आपल्या पुस्तकाची प्रत पाठवून झणझणीत अंजन घालण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे.

शुभ प्रभात,माझे एकेकाळचे मित्र… | Sanjay Raut Presents Book To Eknath Shinde

संजय राऊत यांनी आपल्या X हँडलवरून एक पोस्ट केली आहे. ‘शुभ प्रभात,माझे एकेकाळचे मित्र व त्याच काळातील शिवसेनेतील सहकारी एकनाथ शिंदे यांना “नरकातला स्वर्ग” या पुस्तकाची प्रत पाठवली. शिंदे व सुरत गुवाहाटी ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळीनी हे पुस्तक जरूर वाचावे… जय महाराष्ट्र’, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला चिमटा घेतला आहे. सोबत पुस्तकाचा आणि जोडलेल्या पत्राचा फोटो देखील टाकला आहे. 

संजय राऊत यांची पोस्ट 

‘श्री  एकनाथ शिंदे,  जय महाराष्ट्र !  ‘नरकातील स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले.  श्री. जावेद अख्तर, श्री. शरद पवार, श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी व लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात १०० दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. 

Sanjay Raut Presents Book To Eknath Shinde

या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल !  कळावे.. असे संजय राऊत यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here