पोलिसांनी चप्पलवरून पकडले गुन्हेगाराला

0

मुंबई,दि.१: पोलिसांनी चप्पलवरून ज्वेलर्स दुकानातील दागिने चोरणाऱ्या चोराला पकडले आहे. अनेक गुन्हेगार वेगवेगळी पध्दत वापरून चोरी करत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी पोलिसांना तपास करताना अनेकदा वेळ लागतो. यामुळे गुन्हेगारापर्यंत पोलिसांना पोहोचणे कठीण जाते. अशाच एका किचकट ज्वेलर्स दुकानातील चोरी प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारीही पकडले आहे. मुंबई पोलिसांनी एका अत्यंत किचकट प्रकरण यशस्वीपणे सोडवलं आहे. 

मुंबई पोलिसांनी दमदार कामगिरी करत किचकट प्रकरणात गुन्हेगाराला पकडले आहे. मुंबईतील ज्वेलरी शॅापमध्ये चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे. मालाड पोलिसांनी ही कामगिरी केली असून त्यांनी केवळ चपलांवरून चोराला पकडलं आहे. फक्त चपलांच्या मदतीने चोराला ओळखून त्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आल्याबद्दल पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

सुरुवातीला पोलिसांनी चोराची ओळख पटविण्यासाठी फेशियल रेकग्निशन सिस्टीम वापरली होती.  मात्र त्यात पोलिसांना यश आलं नाही. अखेर कपडे, बदलेल्या मार्गांचा वापर करुनही केवळ चपलांच्या मदतीने चोराला पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या व्यक्तीचं नाव मुकीम मतीन खान असं असून तो 30 वर्षांचा आहे.

वर्सोवा पोलिसांनी याच व्यक्तीने यापूर्वी एका दुकानात अशीच चोरी केली असल्याची माहिती दिली. पोलिसांना दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात, खानने त्याचे कपडे आणि प्रवासाचा मार्ग बदलला होता. परंतु तो चप्पल बदलण्यास विसरला होता. त्याची हीच किरकोळ चूक महत्त्वाची ठरली. सीसीटीव्ही फुटेजमधील आयडेंटीफिकेशन म्हणून वेगळ्या फुटेजमधून चप्पलेच्या माध्यमातून माग काढत पोलिसांनी त्याचा घाटकोपरपर्यंत पाठलाग केला. तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “पकडले जाऊ नये यासाठी त्याने सर्व प्रयत्न करूनही, त्याच्या चप्पलांमुळे तो अडकला.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here