Sanjay Raut On Sunil Raut: आमदार सुनील राऊत बंडखोरी करणार का? संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.26: Sanjay Raut On Sunil Raut: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) हेच आता एकनाथ शिंदे गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त न्युज 18 लोकमतने दिले होते. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आमदार सुनील राऊत यांच्या बद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, “माझे कुटुंब मेले तरी चालेल पण मी शिवसेनेसोबत बेईमानी करणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आमचा श्वास आहे. बोलणारे बोलू देत, जास्तीत जास्त काय होईल सत्ता, खासदारकी जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे संजय राऊत म्हणाले आहेत,” अशी स्पष्टोक्ती संजय राऊतांनी केली. 

सुनिल राऊत हे सध्या कांजूरमार्ग येथे सभा घेत असल्याचा खुलासा त्यांनी केला. दरम्यान, 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. पण, आता स्वतः संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here