Sanjay Raut On Sheetal Mhatre: शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे व्हिडिओ प्रकरणात संजय राऊतांचा इशारा

0

मुंबई,दि.१३: Sanjay Raut On Sheetal Mhatre: एकनाथ शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे व्हिडिओ प्रकरणात संजय राऊतांनी (Sanjay Raut) इशारा दिला आहे. प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील ‘मातोश्री’ नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर संबंधित व्हिडिओत तथ्य आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल तर | Sanjay Raut On Sheetal Mhatre

संजय राऊत यांनी मला या व्हिडिओबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले. आज सकाळी असा काही व्हिडिओ आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आली. पण या व्हिडिओशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते कायद्याचं राज्य नाही. कोणीही व्हिडिओ काढून व्हायरलं करतं, याचा आमच्याशी संबंध नाही. पण सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत.

व्हिडिओ खरा की खोटा याचा तपास करा | Sanjay Raut

व्हिडिओ खरा की खोटा याचा तपास करा. तो व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा तर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. यावर आता शिंदे गट आणि शीतल म्हात्रेंकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कल्याणमधून तरुणाला अटक

शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु करण्यात आला होता. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणच्या कोळशेवाडी परिसरातून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले होते. सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. हा तरुण ठाकरे गटाच्या सोशल मीडिया सेलचं काम पाहतो. शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, डायरे याच्या कुटुंबीयांनी आपल्या घरात शिवसैनिक शिरल्याचा आरोप केला. या शिवसैनिकांनी आपल्याला धमकी दिल्याचेही डायरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण आगामी काळात चांगलेच तापण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here