Sanjay Raut: निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊत यांची टीका म्हणाले, ‘पाळीव कुत्र्याने…’

0

कणकवली,दि.१८: Sanjay Raut On Election Commission’s Decision: निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ‘पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवून नेली तरी मालक भिकारी आणि कुत्रा मालक होत नाही ‘ अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना | Sanjay Raut On Election Commission’s Decision

सकाळी वृत्तपत्रात जल्लोष करत असल्याचं पाहिलं. फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का? असे राऊत म्हणाले.

समाज माध्यमांवर लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात एका म्हणीचा उल्लेख आहे की, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही असे राऊत म्हणाले.

रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही | Sanjay Raut

पुढे बोलताना राऊत म्हणाले ‘ ही शिवसेना आहे. त्यांनी कितीही पाट्या पुसण्याचा प्रयत्न केला तरीही रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही. तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे.’

निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ

या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे असे संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here