मुंबई,दि.15: Sanjay Raut Live: शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात आज पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ही पत्रकारपरिषद शिवसेनेची असली तरी याचा मुख्य आकर्षण बिंदू हे संजय राऊत (Sanjay Raut) हेच आहेत.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही आशीर्वाद दिले
आजची पत्रकार परिषद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील पाहत आहेत. त्यांनीही आशीर्वाद दिले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
मन साफ असेल तर घाबरण्याची गरज नाही
मन साफ असेल तर कुणाच्या बापालाही घाबरण्याची गरज नाही असं बाळासाहेब नेहमी सांगायचे. महाराष्ट्राचं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर
बाळासाहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला.. आयुष्यभराचा मंत्र आहे.. तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका… आज उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत.
भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले..तीन वेळा भेटले. त्यांनी मला वांरवार हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा.
मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा ‘मुलुंडचा दलाल’ असा उल्लेख.
महाराष्ट्र आमच्या बापाचा. पाहू कोण राहतंय. तपास यंत्रणांना हाताशी घेऊन इथं कुणी दादागिरी करू नये. आजची पत्रकार परिषद खरंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर घेणार होतो- संजय राऊत.
बाळासाहेबांचे शब्द ज्या व्यक्तीने सामनाच्या माध्यमातून २३ वर्षे शिवसैनिक आणि सामान्य माणसासमोर आणण्याचे काम केलंय ती व्यक्ती म्हणजे संजय राऊत आहेत. ते भाजपच्या धमक्यांना घाबरतील असं केवळ भाजपवाल्यांनाच वाटू शकतं- संजय राऊत
माझ्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेलपॉलीश करणाऱ्यांचीही ईडीकडून चौकशी- संजय राऊत
मी कपडे शिवले तिथंही ईडीचे लोक चौकशीसाठी गेले, संजय राऊतांचा आरोप.
एका माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात 9 कोटींचे कार्पेट वापरलं गेलं, संजय राऊतांचा आरोप .
फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा. फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊत यांचा आरोप.
निकॉन इन्फ्रा कंस्ट्रक्शन कंपनी कुणाची? ही कंपनी किरीट सोमय्यांची असून ते राकेश वाधवान यांचे पार्टनर आहेत, संजय राऊत यांचा आरोप.
पीएमसी बँक घोटाळ्याचा आरोपी राकेश वाधवान याच्याशी किरीट सोमय्यांचे आर्थिक संबंध. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याचा थेट भाजपाशी आर्थिक संबंध, भाजपाला 20 कोटी रुपये दिले- संजय राऊत
किरीट आणि नील सोमय्यांना तातडीनं अटक करण्याची संजय राऊत यांची मागणी. सोमय्यांच्या गैरव्यवहारांची कागदपत्र 3 वेळा ईडी कार्यालयात देऊनही कारवाई झालेली नाही.
मुंबईत ईडीच्या नावानं 70 बिल्डरांकडून कोट्यवधींची वसुली केली जातेय, संजय राऊतांचा आरोप.
जितेंद्र चंद्र नवलानी कोण आहे? हे सांगावं. हे नाव ऐकून केंद्र, ईडीला घाम फुटला असेल- संजय राऊत.
तुम्ही दिल्लीत जा अथवा ज्यो बायडनकडे जा मला फरक पडत नाही, संजय राऊतांचं भाजपाला रोखठोक आव्हान.
मोहित कंबोज नावाचा व्यक्ती फडणवीसांना बुडवणार- संजय राऊत.
पत्राचाळची जमीन खरेदी करणारा मोहित कंबोज. यात पीएमसी घोटाळ्यातील पैसा वापरला गेला- संजय राऊत.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. तसेच, केंद्र सरकारकडून ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे सांगितले. यावेळी, राऊत यांनी किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या काही आरोपांवर खुलासा केला.
कर्जतमधील कथित जमीन खरेदी प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निशाणा साधला होता. रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये 8 एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नावं का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला होता. बहिणीने भावाकडून जमीन घेताना दोन बोगस बेनामी नावं उभी केली. ही कमाल उद्धव ठाकरेच करु शकतात. उद्धव साहेब जबाव दो, असं आव्हानच सोमय्या यांनी केला होता. या आरोपावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
पाटणकर यांनी कुठलिही देवस्थानची जमीन खरेदी केली नाही. पाटणकरांनी देवस्थानची जमीन कुठे विकत घेतली हे दाखवा… पाटणकर आणि देवस्थानाचा काहीही संबंध नाही. 2014 साली सलिम बिलाखियाकडून ही जमिनी घेतली, त्यानंतर एकामागे एक अशी 12 जणांनी ही जमीन खरेदी केली. त्यात, 12 व्या नंबरला पाटणकर यांनी ही जमीन खेरदी केल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच, उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्याबाबतही राऊत यांनी विधान केलं. जर, 19 बंगले असतील तर आपण तिथं पिकनीकला जाऊ, मी 2 बस करतो, आपण मिळून तेथे पिकनीकला जाऊ, असे राऊत यांनी म्हटले.