बोगस मतदारांचा सुळसुळाट, तात्काळ चौकशीला समिती नेमली…

0

सोलापूर,दि.16 ‘सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात बोगस मतदार, मराठा सेवा संघाकडून तहसीलदार यांना निवेदन’ या मथळ्याखाली ‘सोलापूर वार्ता’ने सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध केली होती यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. देशभरात बोगस मतदारांवरून गदारोळ सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याची धक्कदायक माहिती उघकीस आली होती. 

याबाबत अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघांचे अध्यक्ष प्रविण घाटगे व बबन गायकवाड प्रदीप सलबत्ते, यांनी याबाबतचे पुरावे उपजिल्हाधिकारी देशमुख व तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे लेखी निवेदनाची बातमी प्रसिद्ध होताच तहसीलदार विनायक मगर यांनी तात्काळ मंडळ अधिकारी व तलाठी यांना चौकशीचे पत्र काढले असून, येत्या 15 दिवसात तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सोमवार पासून या चौकशीला सुरवात झाली आहे. 

          

या बाबतची अधिक माहिती अशी कि, सांगवी बु मध्ये गेल्या सहा महिन्यापासून गावातील काही मुलाच्या मोबाईल वरून मतदार नोंदणी चे 6 नं फॉर्म भरण्यात आले होते त्या फॉर्म भरतेवेळी गावातील रहिवाशी नसताना देखील त्यांचे आधार कार्ड व फोटो मागवून त्यांचे फॉर्म मोबाईल वरून भरण्यात आले पण विशेष धक्कादायक बाब अशी कि, या सर्वांच्या आधारकार्डची समोरील बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची आणि मागील बाजूच्या आधारकार्डवर आधार नंबर देखील नसल्याचे उघड झाले असून, असे तब्बल 160 हुन अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक तीन ते चार मुलांच्या मोबाईलच्या मध्यमातून बी एल ओ अशोककुमार सुतार यादी भाग क्र 152 यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करून ही बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

सांगवी बु मध्ये सोमवार पासून एडिट केलेल्या आधार कार्ड ची तपासणी सुरु असून, लवकरच तपासणी पूर्ण करणार असल्याची माहिती सर्कल यांनी दिली असून, आधार कार्ड एडिट केलेल्या व शासनाची फसवणूक केलेल्या सर्व दोशी वर तात्काळ फौंजदारी गुन्हा दाखल करावा. 

प्रविण घाटगे – अध्यक्ष,मराठा सेवा संघ अक्कलकोट तालुका

    


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here