नागपूर,दि.11: Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते लोकार्पण होणार आहे. तब्बल 55 हजार कोटी रुपये खर्च करून 701 किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग साकार होत आहे. हा मार्ग तब्बल 10 जिल्हे व 26 तालुक्यांना जोडणार असून, हा मार्ग महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.
Samruddhi Mahamarg: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत. नागपूर आणि मुंबईला जोडणारा हा महामार्ग पंतप्रधान मोदींच्या देशभरातील महत्त्वाची शहरं दळणवळणाऱ्या माध्यमातून जोडण्याच्या धोरणांचा भाग असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय?
- 701 कि.मी.चा मार्ग
- 17 तास प्रवासाचे अंतर 7 तासांवर येणार
- देशातील सर्वांत मोठा हरित मार्ग, 11 लाख वृक्ष दोन्ही बाजुंनी असणार
- राज्यातील एकूण 36 टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ
- प्रकल्प खर्च : 55,355 कोटी
- 10 जिल्ह्यातील, 26 तालुक्यातील 391 गावातून जाणार
- देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना, मुख्यमंत्री असतानाच केले काम सुरू
- आमदार असतानापासून नागपूर-मुंबई अंतर कमी करण्याचे होते स्वप्न. प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाल्यावरच ते साकार करता आले.
- या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जातीने लक्ष दिले.
- त्याकाळी स्थापन मुख्यमंत्री वॉर रुमचा सुद्धा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प. दर टप्प्याला आणि गतिमान आढावा घेतला जायचा.
- त्यामुळेच अल्पावधीत हा प्रकल्प पूर्ण करता येणे शक्य.
- संपूर्ण राज्यासाठी विकासाचे नवे दालन खुले होणार
- सहा पदरी असणार मार्ग/150 कि.मी. वेगाने वाहन क्षमता
- नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्ण, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ला लोकार्पण करणार
- उर्वरित 181 कि.मी. पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होणार
- 14 जिल्हे पोर्टने जोडले जाणार
- प्रतिदिवशी 30 ते 35 हजार वाहने धावणार
- शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता, एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला चालना मिळणार
- या मार्गावर 9 ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा/20 इंधन स्टेशन्स रस्त्याच्या लगत असणार
- 18 कृषी समृद्धी केंद्रांची या महामार्गाभोवती निर्मिती होणार
- या महामार्गाला जोडून दुष्काळी भागात 1000 नवीन शेततळी/चेकडॅम्स उभारले जाणार
- या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार
- सर्वाधिक गतीने पूर्ण झालेले भूसंपादन : 8800 हेक्टर जागा अवघ्या 12 महिन्यात भूसंपादन
- यासाठी 8003.03 कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले.
- हा महामार्ग 3 अभयारण्यातून जाणार. काटेपुर्णा (अकोला), कारंजा (वाशीम), तेन्सा (ठाणे). त्यामुळे या भागात प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये, म्हणून अंडरपास
- असे एकूण 209 अंडरपास
- ट्राफिक सर्व्हिलन्स, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्री टेलिफोन बुथ प्रत्येक 5 कि.मी. अंतरावर
- या संपूर्ण महामार्गाभोवती आर्थिक गतिविधीमुळे लाखो रोजगार निर्माण होणार