भाजपाच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे द्या; संभाजी ब्रिगेडची PM मोदींकडे मागणी

इयत्ता चौथीच्या पुस्तकाच्या अभ्यासाचे धडे देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

0

सोलापूर,दि.5: सोलापूर संभाजी ब्रिगेडने PM मोदींकडे भाजपाच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे द्या अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपातील नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास माहित व्हावा व पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होऊ नये म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांना इयत्ता चौथीच्या पुस्तकातील धडे द्यावेत अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडने ईमेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

कोणीही उठतो आणि शिवाजी महाराजांबद्दल बोलतो

महाराष्ट्र भाजपा मधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक नवीन भाष्य करतो. त्याची तोडफोड करून भाजप नेते त्यांचा जाणीव पूर्वक अवमान करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर ते साऱ्या राष्ट्राचे महापुरुष होते. त्यांचा अवमान संभाजी ब्रिगेड कदापिही सहन करणार नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा संपूर्ण इतिहासचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

जाहिरात

शिवाजी महाराजांचा अवमान

या महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल भाजपचे गोपीचंद पडळकर, मंगलप्रसाद लोढा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आमदार प्रसाद लाड, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, सुधांशु त्रिवेदी, संजय गायकवाड या भाजपाचे आमदार खासदार राज्यपाल मंत्री लोक वेगवेगळे विधाने करून शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत.

इयत्ता चौथीच्या पुस्तकाच्या अभ्यासाचे धडे द्यावेत

त्यामुळे नरेंद्र मोदींनी या महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना इयत्ता चौथीच्या पुस्तकाच्या अभ्यासाचे धडे द्यावेत जेणेकरून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यांची माहिती होऊन ते पुनश्च असे विधान करणार नाहीत. असे संभाजी ब्रिगेड सोलापूर शहराध्यक्ष शाम कदम यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here