संभाजी ब्रिगेडच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन 

0

सोलापूर,दि.१: समता नायक क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्यावतीने महात्मा बसवेश्वर सर्कल येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या अद्वितीय विचारांनी आणि समाजसुधारणेच्या कार्याने संपूर्ण समाजाला नवी दिशा दिली. ‘अनुभव मंटप’च्या माध्यमातून त्यांनी समानता, बंधुत्व आणि न्याय यांचे महान तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या विचारांचा आपण आपल्या जीवनात अंगीकार करून समाजात समतेचा आणि न्यायाचा प्रकाश पसरवू या असे मनोगत व्यक्त केले. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष मीनलदास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, शहर सचिव सिद्धाराम सवळे, शहर संघटक सतीश वावरे, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, सोहन होनराव, वैभव धुमाळ, शेखर कंटेकर, दिलीप निंबाळकर आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here