सोलापुरात संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन

0

सोलापूर,दि.2: संभाजी ब्रिगेडच्यावतीने बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावामध्ये पोहून अनोखे आंदोलन करण्यात आले. सोलापुरातील विजापूर रोड जवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे तीन-चार कोटी खर्च करून बांधलेला होता. गेल्या चार-पाच वर्षांपासून तो तलाव बंद आहे त्यामुळे नागरिकांची व जलतरणपटूंची गैरसोय होत असल्याकारणाने या रिकामा तलावात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले.

विजापूर रोड जुळे सोलापूर व होडगी रोड परिसरातील नागरिकांना व जलतरणपटूंच्या सोयीसाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता. तात्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते 2018 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून हा जलतरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंना सराव करता येत नाही. 

त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपटू मोठे खेळाडू कसे निर्माण होतील ? नागरिकांच्या कर रूपाने करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व ॲडवेंचर पार्क सारखे वास्तू उभारले जातात पण त्याची निगा घेतली जात नाही. महानगरपालिका प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करोडो रुपये पाण्यात गेल्यासारखे आहे. 

त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्यावतीने या रिकाम्या तलावात उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख शेखर चौगुले, दिलीप निंबाळकर, मल्लिकार्जुन चाबुस्कर, विठ्ठल भोसले, आकाश कोळी, सिद्धार्थ राजगुरू, महेश भंडारे, सचिन वनमाने, रमेश चव्हाण, राजेंद्र माने, भरत भोसले, ओंकार कदम, सिद्धाराम कोरे, शेखर कंटेकर, रमेश चव्हाण, साईनाथ फडतरे आदि उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here