सोलापूर,दि.3: जालना लाठीमार: संभाजी ब्रिगेड व मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जालना येथील मराठा समाज अत्यंत शांततेत संविधानिक मार्गाने आंदोलन करीत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार केला त्यामध्ये अनेक महिला व लहान मुलं तसेच वयोवृद्ध जखमी झाले. या लाठीमार हल्ल्याच्या आदेश देणारे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने यावेळी केली.
जालना लाठीमार: संभाजी ब्रिगेडने केले रास्ता रोको आंदोलन
सोलापुरातील आसरा चौकात संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड व मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाज आक्रमक झाला असून सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. सोलापुरातील अनेक भागात आंदोलन करण्यात आले.
यावेळी श्याम कदम, विशाल ताकमोगे, अरविंद शेळके, सिताराम बाबा, रमेश चव्हाण, चंद्रशेखर कंटेकर, रासपचे शहराध्यक्ष नागेश शिंदे, प्रकाश जाधव, अतुल निंबाळकर, शुभम फाळके, दत्ता जाधव, विवेक डोलारे, पिंटू कोरे, बाळासाहेब फाळके, सचिन होनमाने, विजय भोसले, मारुती सुरवसे, ज्ञानेश्वर सुरवसे, अमोल सलगर, प्रशांत टक्कर, अनिल गवंडी, पृथ्वीराज रजपूत, अजय मारनूर, रोहन भिमनगर, अजिंक्य शिंदे, सतीश माडकर, आनंद जाधव, दत्ता पवार, विजय भोसले, गजानन शिंदे, अजय कदम, अक्षय चुलबुले आदी कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलिसानी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी आसरा चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.