Rishabh Pant News: ऋषभ पंतने सांगितले अपघाताचे कारण झोप किंवा ओव्हरस्पीडिंग नाही तर…

0

देहरादून,दि.31: Rishabh Pant News: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा अपघात झाला. हा अपघात झोप लागल्याने किंवा ओव्हरस्पीडिंगमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अपघाताची निरनिराळ्या अंगाने चर्चा होत आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यापासून ते सेलिब्रिटी, क्रीडापटू यांच्यापर्यंत अनेकांनी या अपघाताची दखल घेतली आहे.

ऋषभ पंतने अपघाताचे कारण सांगितले | Rishabh Pant News

अपघाताचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्यानंतर अनेकांनी अपघातासाठी ओव्हरस्पीडिंग हे एक कारण असू शकते? असा अंदाज लावला होता. तर काहींनी म्हटले होते की, ऋषभचा डोळा लागला म्हणून अपघात झाला असावा. पण खुद्द ऋषभनेच या अपघाताचे खरे कारण सांगितले आहे.

Rishabh Pant News
ऋषभ पंत कार अपघात

ऋषभ पंतचा अपघाताबाबत नवा खुलासा | Rishabh Pant Latest News

रुरकी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सध्या पंत देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. याठिकाणी त्याला भेटण्यासाठी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) ची टीम पोहोचली आहे. यावेळी डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांच्याशी बोलत असताना ऋषभ पंतने अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे. पंत म्हणाला की, “गाडी चालवत असताना समोर एक खड्डा आला. खड्डा वाचवत असताना हा अपघात झाला.”

जाहिरात

श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतला अपघाताचे कारण विचारले होते. यावेळी त्यांना उत्तर देत असताना पंत म्हणाला की, रात्रीची वेळ होती. समोर खड्ड्यासारखं मला काहीतरी दिसलं. म्हणून खड्डा वाचविण्याचा प्रयत्न मी केला. त्यामध्ये हा अपघात झाला.” श्याम शर्मा यांनी पुढे सांगितले की, सध्यातरी ऋषभ पंतच्या पुढीला उपचारासाठी त्याला एअरलिफ्ट करण्याची गरज नाही. त्याला दिल्लीला हलविले जाणार नाही. लेगामेंट उपचारासाठी जर लंडनला जायचे असेल तर त्याचा निर्णय बीसीसीआय घेईल.

कसा झाला होता अपघात? | Rishabh Pant Accident

ऋषभ पंत दिल्लीहून रुरकी येथे आपल्या घरी आईला भेटण्यासाठी जात होता. दिल्ली-देहरादून महामार्गावर पहाटे 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. उत्तराखंडमधील हरिद्धार जिल्ह्यात एका वळणावर पंतची गाडी दुभाजकावर आदळली आणि अनियंत्रित झाली. अपघातामुळे गाडी अनेकदा पलटली आणि पेट घेतला. पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला मार लागला आहे. नजीकच्या सक्षम रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला देहरादून येथील रुग्णालयात हलवण्यात आलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here