रीवा,दि.26: Rewa Crime News: एमपीच्या रीवा येथे प्रेयसीला बेदम मारहाण करणाऱ्या निर्दयी प्रियकराला यूपीतील मिर्झापूर येथून पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी स्टेशन प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर बुलडोझर चालवून आरोपीचे घर उद्ध्वस्त केले. पोलिसांनी आरोपी पंकज त्रिपाठीविरुद्ध अपहरण, प्राणघातक हल्ला आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेदम मारहाण पाहून सर्वांचेच हृदय हेलावले | Rewa Crime News
हे प्रकरण रेवा जिल्ह्यातील मौगंज येथील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या मैत्रिणीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. बॉयफ्रेंडने प्रेयसीला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ पाहून लोकांत संताप पसरला. त्याची बेदम मारहाण पाहून सर्वांचेच हृदय हेलावले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रियकर-प्रेयसी गावातील सुनसान रस्त्यावर होते. प्रियकरानं तरुणीला इतक्या जोरात कानशिलात लगावली की ती थेट जमिनीवर कोसळली. तरीही नराधम थांबला नाही त्यानं तिच्या चेहऱ्यावर लाथा मारल्या याचा भयानक व्हिडिओ व्हायरल झाला.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान संतापले | MP News
संबंधित घटेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संताप व्यक्त केला. तसंच महिलांविरोधातील अत्याचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. या ट्विटरमध्ये नराधमाच्या घरावर चालवण्यात आलेला बुलडोझरचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.
स्टेशन प्रभारी निरीक्षकही निलंबित | MP Crime News
त्याचवेळी पीडितेने आरोपीच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. व्हिडीओ व्हायरल करणारा आरोपी भरत साकेत यालाही पोलिसांनी पकडले आहे. पंकज त्रिपाठी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. शनिवारी पोलिसांनी या तरुणाला अटक केली होती. त्याचवेळी या घटनेत निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक श्वेता मौर्य यांना निलंबित करण्यात आले. काल सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर पसरला होता.