निवृत्त सिव्हील सर्जन पट्टणशेट्टी यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.२: निवृत्त सिव्हील सर्जन पट्टणशेट्टी यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मुलगा मतिमंद नसताना देखील मतिमंद असल्याचे सर्टिफिकेट देऊन सदर कर्मचाऱ्याच्या बदली प्रकरणात त्याला मदत केल्याप्रकरणी निवृत्त सिव्हील सर्जन एम.आर. पट्टणशेट्टी यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी अटकपूर्व जामीन मंजुर केला.

कुर्डुवाडी येथे अपंगाच्या मेळाव्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या मुलाची तपासणी सिव्हील हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी तपासणी करुन सदरचा मुलगा अपंग आहे असे सर्टिफिकेट दिले होते. सदर सर्टिफिकेटवर सिव्हील सर्जन डॉ. पट्टणशेट्टी व कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांनी काऊंटर सिग्नेचर केलेली होती.

सदर सर्टिफिकेटचा वापर करुन सदर कर्मचाऱ्यांनी बदली रद्द करुन घेतली होती. याप्रकरणी सदर कर्मचारी व डॉ. पट्टणशेट्टी आणि ग्रामीण रुग्णालय प्रमुख यांच्याविरुध्द कुर्डुवाडी पोलीस स्टेशनला कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४१७ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. डॉ. पट्टणशेट्टी यांचा अटकपूर्व जामीन बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर झाली.

निवृत्त सिव्हील सर्जन पट्टणशेट्टी यांना अटकपूर्व जामीन मंजूर

आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायमूर्तींनी निवृत्त
सिव्हील सर्जन डॉ. पट्टणशेट्टी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केला.

याप्रकरणी डॉ. पट्टणशेट्टी यांच्यातर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. सत्यव्रत जोशी तर सरकारतर्फे ॲड. श्रीकांत यादव यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here