नवी दिल्ली,दि.10: Frank Hoogerbeets: तुर्की आणि सीरियामध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून यात 20 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपातील जीवितहानी पाहून संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. पण या भूकंपाचं भाकीत डच संशोधक फ्रँक हॉगरबिट्स (Researcher Frank Hoogerbeets) यांनी आधीच केलं होतं, जे खरं ठरलं आहे. त्याचवेळी त्यांनी आणखी एक भविष्यवाणी केली आहे जी भारत आणि पाकिस्तानला इशारा देणारी आहे. फ्रँक हॉगरबिट्स यांच्या दाव्यानुसार आता आशियाई देश आपत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. सोशल मीडियावर फ्रँकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मोठ्या भूकंपाची भविष्यवाणी करताना दिसत आहे. (Frank Hoogerbeets On Earthquake)
भारत पाकिस्तानला भूकंपाचा इशारा | Frank Hoogerbeets On Earthquake
मीडिया रिपोर्ट्सनुसार फ्रँक हॉगरबिट्स म्हणाले की, आता आशियाई देशांना भूकंप किंवा तुर्कीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची वेळ आली आहे. फ्रँकने दावा केला की पुढील भूकंप अफगाणिस्तानपासून सुरू होईल आणि पाकिस्तान आणि भारतातून पुढे जाऊन हिंदी महासागरात संपेल. मोहम्मद इब्राहिम नावाच्या एका ट्विटर युजरने माहिती दिली की डच संशोधक फ्रँक हॉगरबीट्स यांनी तीन दिवसांपूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाची भविष्यवाणी केली होती आणि त्यांनी पुन्हा एकदा भाकीत केलं आहे.
आशियाई देश भूकंपाचे बळी ठरतील | Frank Hoogerbeets
जर आपण वातावरणातील चढ-उतार पाहिल्यास आशियाई देश भूकंपाचे बळी ठरतील हे स्पष्ट असल्याचं फ्रँक हॉगरबीट्स यांनी म्हटलं आहे. भूकंप काही सांगून येत नाही, त्यामुळे हा अंदाज तात्पुरता आहे. सर्वच भूकंप नेहमीच शोधता येत नाहीत, असंही ते पुढे म्हणाले. फ्रँक हॉगरबीट्स सोलर सिस्टीम जिओमेट्री सर्व्हे (SSGS) नावाच्या संस्थेत संशोधक आहेत.
1999 साली आला होता विनाशकारी भूकंप
तुर्कीमध्ये अनेकदा भूकंप होत असतात. 1999 च्या भूकंपात सुमारे 18000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 45000 हून अधिक लोक जखमी झाले होते. गोलकुक आणि देउझ प्रांतात 7.4 आणि 7.0 तीव्रतेचे दोन भूकंप झाले होते. 2011 मध्ये, पूर्वेकडील वॅन शहरात 7.1 तीव्रतेच्या भूकंपात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यावेळी आतापर्यंत 20000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
भूकंपाची भविष्यवाणी
अहवालानुसार, 3 फेब्रुवारी 2023 च्या भूकंपाच्या तीन दिवस आधी, नेदरलँड-आधारित सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGS) साठी काम करणार्या डच संशोधक फ्रँक हॉगरबिट्स यांनी याचा अंदाज वर्तवला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन या प्रदेशात लवकरच 7.5 तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता वर्तवली होती.