सोलापूर, दि.18: गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने साला बादप्रमाणे यंदाच्या वर्षी बसव जयंती साजरी करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी बसव जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी रेणुका हब्बू यांची निवड संस्थापक अध्यक्ष सोमशेखर भोगडे यांनी केली.
तसेच रेणुका हब्बू यांचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजश्री तडकासे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे इतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते. रेणुका हब्बू यांनी सांगितले यंदाही 3 मे रोजी सकाळी कौतम चौक येथे महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
तसेच प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर, मोफत क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तीना गुरूविद्या बसव पदव्या प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने विविध वर्षभरात शहर आणि ग्रामीण भागात शैक्षणिक, आरोग्य शिबीर, अन्नदान, मुलांचे शैक्षणिक खर्च, दत्तक योजना राबविले जातात.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव श्रीदेवी यळमेली, सौ अरूणा हणमगाव, शिवलीला भोगडे, प्रतिक्षा खडाळकर, नर्मदा कनकी, नमिता थिटे, मोहन भूमकर, विजू भोगडे, मंजूर शेख, आनंद लिगाडे, सुर्यकांत राजूरे उपस्थित होते.