सोलापूर,दि.९: सोलापुरातील (Solapur) विजापूर रोडवरील सोरेगाव येथील नागेश ऑर्केस्ट्रा डान्सबारवर (Nagesh Orchestra Dancebar) दुसऱ्यांदा पुन्हा धाड टाकण्यात आली. ऑक्टोबर महिन्यातच सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी धाड टाकली होती. त्यानंतर अवघ्या ४० ते ४५ दिवसात पुन्हा त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा धाड पडल्याने ऑर्केस्ट्राबार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नागेश ऑर्केस्ट्रा डान्सबारमध्ये (Nagesh Orchestra Dancebar) नियमाचे उल्लंघन करून डान्स सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी धाड टाकली. (Red on Nagesh Orchestra Dancebar in Solapur)
नागेश ऑर्केस्टा अँड बार सोरेगाव विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी बारचे मालक, मॅनेजर व वेटर हे संगिताच्या तालावर बारमध्ये विना परवाना महिलांना संगीताच्या तालावर १) सुनिल संगमेश्वर सुरगीहळळी, वय ३७ वर्षे, (बार मालक यांचा मुलगा), २) शंकर रघुनाथ दुपारगुडे, वय – ३६ वर्षे, (मॅनेजर ऑर्केस्टा बार), ३) सुभाष सुर्यकांत कुरले, वय ३७ वर्षे (मॅनेजर ऑर्केस्टा बार), ४) मंजुनाथ सुखदेव जाधव, वय ३८ वर्षे, ( साऊंड सिस्टम चालक), यांनी अश्लिल नृत्य करण्यास प्रवृत्त केले व ग्राहक ५) दिपक किसन चव्हाण, वय ३३ वर्षे, (वेटर), ६) दशरथ श्रीशैल शिंदे, वय २५ वर्षे, (वेटर), ७) अविनाश विजयकांत भरले, वय २३ वर्षे, (ग्राहक), ८) इक्बाल आयुब बागवान, वय ३० वर्षे (ग्राहक), ९) इब्राहिम फारुक बागवान, वय ३५ वर्षे (ग्राहक), १०) गणेश लक्ष्मण गायकवाड, वय ३० वर्षे, (ग्राहक), ११) अनिकेत मल्कप्पा बिजनुर, वय ५० वर्षे, (ग्राहक), १२) राहुल दत्तात्रय जाधव, वय ४४ वर्षे, (ग्राहक), १३) विश्वेश्वर नामदेव कमळे, वय ४६ वर्षे, (ग्राहक ), १४) काशिनाथ शंकर गायकवाड, वय ५२ वर्षे, (ग्राहक), १५) श्रीनिवास शेतुमाधव पाटील, वय ४१ वर्षे, यांनी अश्लिल नृत्य करीत असलेल्या महिलांवर पैसे उडवुन त्यांना प्रोत्साहित करीत असताना मिळून आले. म्हणून सदर घटनास्थळावरुन नमुद १५ आरोपी व एकुण ३,७७, १४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन सदरबाबत विजापूर नाका पोलीस ठाणे गु.र.नं. ६४३ / २०२१ भा.द.वि.सं कलम २९४, १०९, ११४ सह महाराष्ट्र हॉटेल, रेस्टॉरंट बार रुमध्ये अश्लिल नृत्यास प्रतिबंध आणि महिलांची प्रतिष्ठा संरक्षण कायदा २०१६ चे कलम ३,८(१) (२) (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी धाड (Police Red) टाकल्यानंतर आतमध्ये वरच्या मजल्यावर व खाली दोन्हीकडे नृत्यांगना नृत्य करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच डान्सबारमध्ये एकच खळबळ उडाली. वरच्या मजल्यावर असलेल्या चार नृत्यांगना अंधाराचा फायदा घेऊन पाठीमागील दारातून पळून गेल्या. खालच्या मजल्यावर असलेल्या १० नृत्यांगनांना भरारी पथकाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. ऑर्केस्ट्रा बारवर डान्सबारला शासनाने परवानगी दिली असली तरी आतमध्ये कोरोना नियमाचे उल्लंघन होत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले.
फक्त मोजक्याच नृत्यांगनांना परवानगी असताना खाली आणि वर दोन्ही ठिकाणी १४ महिला नृत्य करीत होत्या असे समजते. ही कारवाई भरारी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार भालशंकर, पोलीस नाईक योगेश बर्डे, पोलीस नाईक वाजिद पटेल, पोलीस नाईक शीला काळे, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळुंखे, नरेंद्र नक्का यांनी केली.