अभिनेते रझा मुराद यांनी दारु पित असल्याच्या व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.19: अभिनेते रझा मुराद (Raza Murad) यांनी रमजानमध्ये दारु पित असल्याच्या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मिडीयावर रझा मुराद यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. मुराद यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. रमजानचा महिना सुरू आहे. अशातच मुराद यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुराद यांनी स्पष्टीकरण दिले. 

व्हायरल व्हिडिओत रझा मुराद यांच्या हातात दारुचा ग्लास असून ते मद्यपान करताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी त्यांना रमजानच्या पवित्र महिन्यात मद्यपान करत असल्याने सुनावलं. यावर मुराद म्हणाले, आपण मद्यपान करत नव्हतो तर दिल्लीत एका वाढदिवसाच्या सीनचं शूटिंग करत होतो. मुराद यांनी पोस्ट शेअर करत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. 

ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मित्र जितके जुने, मैत्री तितकी घट्ट! जेव्हा तुम्ही मित्रांसह काम करत असता तेव्हा रिअल आणि रीलमधील अंतर बाजूला होतं”.

View this post on Instagram

A post shared by Kiran Kumar (@kirankumarkay)

मुराद यांनी स्पष्टीकरण देताना लिहिलं आहे की, “कृपया तुम्ही ही दारुची किंवा वाढदिवसाची पार्टी आहे असं समजू नका. ही एका प्रोडक्शनमध्ये सुरु असलेल्या चित्रपटातील क्लिप आहे, जिचं शुटिंग दिल्लीत सुरु होतं. चित्रपटातील माझ्या  पात्राचा वाढदिवस साजरा केला जात आहे. हा चित्रपटातील सीन आहे. तुम्ही उगाच त्याला दारु पार्टी समजत आहात. माझा वाढदिवस 23 नोव्हेंबरला असतो आणि हा मार्च महिना सुरु आहे.”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here