जयपूर,दि.९: स्वत:च्याच सरकारवर भाजपच्या मंत्र्यांने खळबळजनक आरोप केला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर आरोप केले जातात. मात्र राजस्थानमध्ये चक्क भाजपच्या मंत्र्यांने स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, असा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळीही फोन टॅपिंगचा मुद्दा गाजला होते.
राजस्थानमध्ये विरोधी पक्षाने नाही तर सत्ताधारी मंत्र्यांनीच आपला फोन टॅप होत असल्याचा आणि आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. राजस्थानचे कॅबिनेट मंत्री किरोडीलाल मिणा (Kirodi Lal Meena) यांनी स्वत:च्याच सरकारविरुद्ध फोन टॅपिंगचा आणि पाळत ठेवल्याचा आरोप केला आहे.
जयपूरमधील एका मंदिरात बोलताना त्यांनी हा आरोप केला. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानच्या राजकारण खळबळ उडाली असून काँग्रेसने मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
परीक्षा घोटाळ्याबाबत मी आवाज उठवा असता सरकारने माझ्यामागे सीआयडी लावली, माझ्यावर पाळत ठेवली आणि फोन टॅप केला, असा आरोप किरोडीलाल मिणा यांनी केला.