सावंतवाडी,दि.२७: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी कधीपर्यंत निर्णय देणार ते सांगितले आहे. नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नियमांच्या आधारे सुनावणी घेत असून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालावधीत सुनावणी पूर्ण होईल पण काय होईल ते आज सांगू शकणार नाही सरकारे ही बहुमताने ठरतात बहुमत नसेल तर ती कोसळतात त्यामुळे सरकार कधी कोसळणार हे आदित्य ठाकरे ठरवू शकत नाही, असा टोला विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी ठाकरे यांना लगावला.
31 डिसेंबर पर्यत ठाकरे गट व शिंदे गट यांच्यातील सुनावणी पूर्ण करणार असल्याचेही अॅड.नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अध्यक्ष अॅड.नार्वेकर यांचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी स्वागत केले.यावेळी प्रांताधिकार प्रशांत पानवेकर,तहसिलदार श्रीधर पाटील,लखमसावंत भोसले आदि उपस्थित होते.
नार्वेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असायला हवी. त्यासाठी विधीमंडळाच्या माध्यमातून शक्यतो प्रयत्न केला जाईल कोकणातील मुंबई ते गोवा आणि रेडी ते रेवस दोन रस्ते पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचे आहेत.
आदित्य ठाकरे यांनी सरकार ३१ डिसेंबर ला कोसळणार आहे असे म्हटले होते याकडे लक्ष वेधले असता अँड राहुल नार्वेकर म्हणाले, सरकार पडते किंवा टिकते यासाठी सभागृहातील संख्याबळावर अवलंबून असते.आज संविधान दिवस आहे. संविधानात याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सभागृहातील संख्याबळावर, बहुमत महत्त्वाचे ठरते. आदित्य ठाकरे म्हणणार त्यावर ठरत नसते विधानसभा अध्यक्ष याबाबत कायदेशीर योग्य निर्णय देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवकरच निर्णय घेतला जाणार असे ही त्यांनी सांगितले.
 
            
