आमदारांच्या अपात्रतेसंदर्भांत लवकरच निर्णय? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून आमदारांना नोटीस

ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस

0

मुंबई,दि.8: आमदारांच्या अपात्रतेसंदर्भांत लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवताच राहुल नार्वेकर हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भांत राहुल नार्वेकरांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षाला म्हणंण मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस जारी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार निर्णय?

सुप्रीम कोर्टाकडून अपात्र आमदारांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवण्यात आली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेऊ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. अखेर निवडणूक आयोगाकडून विधानसभा अध्यक्षांना घटनेची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राहुल नार्वेकर अ‍ॅक्शनमोडमध्ये

घटनेची प्रत प्राप्त होताच आता राहुल नार्वेकर हे अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांच्याकडून दोन्ही पक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एकोंमेकांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत दावा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी आमदारांना पुराव्यासह आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here