राहुल गांधी यांनी घेतला सोलापूरी जेवणाचा आस्वाद, स्वत: तळली सोलापूरी आंध्रा भजी

आमदार प्रणिती शिंदे यांनी केले होते नियोजन

0

सोलापूर,दि.19: काँगेस नेते खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोलापूरी जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधी यांनी स्वत: सोलापूरी आंध्रा भजी तळली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी सोलापूरी जेवणाचा आस्वाद घेतला.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली “भारत जोड़ो” यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. अकोला जिल्हा भारत जोड़ो पदयात्रेची जबाबदारी प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे सोपविली होती. 17 नोव्हेम्बर 2022 रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापुर, पातूर, वडेगाव, धानेगाव येथे भारत जोड़ो पदयात्रा होती. या दिवशी खा. राहुलजी गांधी आणि काँग्रेस नेतेमंडळी यांच्या दुपारच्या जेवनाच्या मेजवानीचा बेत आ. प्रणिती शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर ते बाळापुर मार्गावरील गजानन रोपवाटिका येथे आयोजीत केला होता.

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्या संकल्पनेतून भारत जोडो यात्रेमध्ये पातूर ते बाळापूर, अकोला या मार्गावरील श्री गजानन रोप वाटीका येथे खासदार राहूल गांधी व भारत जोडो यात्रींकरिता सोलापूरी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.

सदर स्टॉलमध्ये आंध्रा भजी बनवित असलेले पाहून राहूल गांधी यांनी महिलांना विचारले की मी पण हे बनवू शकतो का अशी परवानगी घेत राहुल गांधी स्वतः भजी तळली.

या स्टॉलवर कडक ज्वारीची भाकरी, कडक बाजरीची भाकरी, धपाटे, आंध्रा भजी, शेंगा चटणी, दही, खिर (हुग्गी) चा समावेश होता. या खाद्यपदार्थांचा आस्वाद राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये घेतला व आमदार प्रणिती शिंदे आणि याकरिता राबलेल्या सर्व टीमचे कौतुक केले आणि खाद्यपदार्थ खूप सुंदर होते अशी भावना व्यक्त केली.

सोलापूरी खाद्यपदार्थ बनविण्याकरीता सोलापूर येथील यल्लप्पा तुपदोळकर, शांतकुमार बलगेरी, महानंदा रामपूरे, लक्ष्मी यादगिरी, पद्मिणी शेट्टीयार व समाधान हाके यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here