Purushottam Barde: श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करा: पुरुषोत्तम बरडे

Purushottam Barde: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं

0

सोलापूर,दि.19: Purushottam Barde on Bhagat Singh Koshyari: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अवमान करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून ताबडतोब हकापट्टी करा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (Purushottam Barde) यांनी केल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं विधान राज्यपालांनी केलं आहे.

भगतसिंग कोश्यारी हे एक मनोरुग्ण आहे. वारंवार जाणून बुजून महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. भगतसिंग कोश्यारी राज्यपालाच्या खुर्चीवर बसल्यापासून अनेक वेळा त्यानी प्रक्षोभक भडकावू शब्द महापुरुषांच्या प्रति वापरले आहेत. श्री छत्रपतींची तुलना नितीन गडकरीची यांच्याशी करून महाराजांना कमी लेखण्याचा काम या कोश्यारी यांनी केले आहे.

शिवराय हे तमाम हिंदूंचे दैवत आहेत. शिवसेना त्यांचा अवमान सहन करणार नाही. भगत कोश्यारी यांना ताबडतोब राज्यपाल पदावरून काढावे. अन्यथा शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here