सोलापूर,दि.27: सर्व देशभर पसरलेल्या कोविड -19 (Covid -19) साथीच्या आजाराचे पुनरुत्थानाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे विविध उपाययोजना करीत आहे. चेहऱ्यावर मास्क (Mask) घालणे ही एक विशिष्ट मार्गदर्शक सूचना आहे. रेल्वे परिसरामध्ये मास्क न घातलेल्या व्यक्तींना रू. 500/- रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे.
कोविड -19 परिस्थिती पाहता, जीव /जनतेला धोका होण्यासारखी अशुद्ध/अस्वच्छ आरोग्य परिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता रेल्वेच्या आवारात व ट्रेनमध्ये एखादी व्यक्ती मास्क न घालता प्रवेश करत असेल तर अशांवर कारवाई करण्यात येत आहे.
सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकावर (Solapur Railway Station) आणि ट्रेनमध्ये मास्क न घातल्यामुळे दिनांक 26 डिसेंबर -2021 रोजी तपासणीत 13 प्रवाशांकडून दंड स्वरूपात रूपये 3000/- वसूल करण्यात आले आहेत.
कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य प्रकारे मास्क घालण्याचे, साबणाने/पाण्याने नियमितपणे हात धुण्याचे, सॅनिटायझर वापराचे आणि सोशल डिस्टंसिंग राखण्याचे आवाहन केले आहे.