सोलापूर,दि.27: Solapur News: मानवी जीवनात ग्रंथाचे, वर्तमानपत्रांचे, वाचन साहित्याचे अन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये साक्षर व ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीत मोलाची भूमिका बजावू शकतात. पुस्तके वर्तमानपत्रे विकत घेण्याची ऐपत नसणा-यासाठी ती सामान्य माणसांची विद्यापीठे आहेत. म्हणून सरकारने सार्वजिन ग्रंथालयांना शंभर टक्के अनुदान द्यावे कर्मचा-यांना वेतनश्रेणी लागू करावी असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले.
सदाशिव बेडगे आणि पत्रकारांचा सत्कार | Solapur News
शासनाने सार्वजनिक वाचनालयांना 60 टक्के अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या पुणे विभाग ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे, धोंडीराम जेवूरकर या दोघांना कपडेंचा आहेर शाल व नॅपकीन बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आकाशवाणी केंद्राचे वृत्तनिवेदक पद्माकर कुलकर्णी, पत्रकार भिमा गवळी, भरतकुमार मोरे, अरविंद मोटे, नंदकुमार येंच्चे यांचा हिराचंद नेमचंद वाचनालयात शाल, नॅपकीन बुके देवून सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. भिमाशंकर बिराजदार हे होते. यावेळी श्री ब्रहनमठ होटगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास सिध्दाराम हलकुडे, रामचंद कदम, अरिहंत रत्नपारखे, नरसिंह मिसालोलू, गिरीश मठपती, जगदीश गिडवीर, तात्या भोसले, तिपण्णा गणेरी, संगीता कुमठेकर, दत्ता मोरे, इ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक तात्या भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन नरसिंह मिसालेलू यांनी केले.